This article provide the answer key of July 2026 questions paper conducted by Maharashtra Board Pune.
मराठी अक्षरभारती
MARATHI JULY 2025 ANSWER KEY
PDF link of answer Key is given in the bottom of this article.
बोर्डाच्या कृतिपत्रिकेची उत्तरे : जुलै 2025
प्र. 1. (अ)(1) (i) चूक. (ii) बरोबर. (iii) बरोबर. (iv) चूक.
(2)नारायण सुर्वे यांना कार्यक्रमात मिळणाऱ्या वस्तू :- शाल. श्रीफळ
(3) ‘शाल’ हे सन्मानचिन्ह आहे. ‘शालीनता’ हा सज्जन माणसाचा स्वभावधर्म आहे. जी व्यक्ती मुळात शालीन असते, तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याचा शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो, त्याला शालीने कितीही नटवले, तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे. कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्त्व हे अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे, म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्त्वाचा सत्कार करणे उचित ठरते.
उताऱ्यात आलेली कथाकारांची नावे
(1)य. गो. जोशी
व. पु. काळे
शंकर पाटील
वि. स. खांडेकर
(2) (i) कथेची थोरली बहीण:- कादंबरी कथा.
(ii) ललितकलांचा पाया असलेली
(3) पुस्तकांसारखा मित्र जगात कुणी नाही. पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजे आपले जीवन समृद्ध करणे. पुस्तके निःस्वार्थी असतात. ती आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करीत नाहीत. जेव्हा हवी असतील, तेव्हा ती वाचनासाठी मिळतात. त्यांना आपण कुठेही आपल्याबरोबर नेऊ शकतो. ती कोणतीही तक्रार करीत नाहीत किंवा हट्ट धरत नाहीत. पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान व माहिती मिळते. पुस्तकांमुळे आपले मनोरंजन होते. पुस्तके आपल्याला चांगली शिकवण देतात. देशोदेशीची सफर घडवून आणतात. पुस्तकांमुळे आपल्या जीवनात आनंद येतो. पुस्तकांमुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन आपले जीवन समृद्ध व सुखकर होते. म्हणून पुस्तकांशी घट्ट व अतूट मैत्री करावी.
(इ)(1) विद्यार्थ्यांच्या चारित्र्यासाठी आवश्यक असलेली पंच तत्त्वे
मैत्री प्रज्ञा. शील करुणा विदया
(2)(i) करुणेशिवाय मानव दानव
(ii) दुधारी तलवार विद्या
(iii) मानवजातीसंबंधी प्रेमभाव करुणा
(iv) मनुष्यप्राणी अन्नाची जरुरी
प्र. 2. (अ)(1) (i) धान्य न देणारा संगणक
2 (ii) पाण्याच्या तुषारांचा रंग फेनधवल (पांढरा)
(2) (i) यंत्रांच्या संगतीने पैसा व दौलत मिळेल.
(ii) वृष्टी आभाळातून होईल.
(3) (i) अनोखी वेगळी (निराळी)
(ii) सृष्टी जग
(iii) पुष्टी दुजोरा (पाठबळ)
(iv) तुष्टी – तृप्ती.
(4) पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे हे सांगताना कवयित्री म्हणते रंग उद्याचे व रंग मजेचे पाहण्यासाठी या सृष्टीला जिवाभावाने जपायला हवी. संगणक हा अन्नधान्य देत नाही. त्यामुळे मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ देऊन काळ्या आईची सेवा करायला हवी. डोंगरावर बिया उधळून दयाव्यात. त्यांतून देशी झाडे उगवतील. दाट राने फोफावतील. त्यामुळे पावसाचा वर्षाव होऊन धरती हिरवीगार होईल. पृथ्वीला दुष्काळापासून वाचवण्यासाठी झाडे लावायला हवीत. निसर्गाचे सौंदर्य टिकवायला हवे. मातीशी असलेली आपुलकी तोडू नये. पर्यावरणाची जोपासना करणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. पृथ्वीला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करायला हवेत. तेव्हाच धरतीवरच्या हिरव्या छटा पाहून मानवी मन आनंदित होईल.
स्वप्न करू साकार
(1) प्रस्तुत कवितेचे कवी किशोर पाठक.(
2) प्रस्तुत कवितेचा विषय : देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न या कवितेत रेखाटले आहे.
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ
“आमचा भारत देश समृद्ध करून, या जगाचे वैभव आणि दौलत लाखो वेळा वाढवू आणि त्यांची जोपासना करू.”
( 4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणया देशभक्तिपर गीतात नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कवीने मार्गदर्शन केले आहे. हे करताना कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकात्मतेचे सामर्थ्य या मूल्यांचा पुरस्कार केला आहे. नवीन पिढीसाठी नवी स्वप्ने साकार करण्याचा विचार मांडणारी ही कविता मला आवडली.
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ
(i) विभव वैभव
(ii) हस्त = हात
(iii) मंगल पवित्र
(iv) चक्र चाक.
अंकिला मी दास तुझा
प्रस्तुत कवितेचे कवी संत नामदेव
(2) प्रस्तुत कवितेचा विषय अंकिला मी दास तुझा
देवाला आई मानून, देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ मायेने करावा, अशी विनवणी करणारा हा अभंग आहे.
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थझाडावरून अचानक जर पिल्लू खाली पडले, तर लगेच पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. पिल्लाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते.
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणया अभंगात संत नामदेव यांनी श्रीविठ्ठलाला आई संबोधून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. आई किती जपते आपल्याला ! देवानेही आईप्रमाणे आपल्यावर नित्य माया करावी, हा विचारच मनाला भावला. म्हणूनच मला हा अभंग खूप आवडला.
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ
(i) काजकाम(ii) धेनू गाय(iii) कनवाळू = दयाळू(iv) मेघ ढग.
https://drive.google.com/file/d/1GqvPTTY8gK9-dyHtcUu1DQxU2uVYpezw/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1GqvPTTY8gK9-dyHtcUu1DQxU2uVYpezw/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1GqvPTTY8gK9-dyHtcUu1DQxU2uVYpezw/view?usp=drivesdk
